कॉर्न-मिक्स व्हेज बिर्याणी (Corn Mix Veg Biryani)

कॉर्न-मिक्स व्हेज बिर्याणी (Corn Mix Veg Biryani)

कॉर्न-मिक्स व्हेज बिर्याणी

साहित्य : पाव कप उकडलेले मक्याचे दाणे, पाव कप बारीक चिरलेल्या मिश्र भाज्या, अर्धा कप तांदूळ, 2 तमालपत्र, 1 टेबलस्पून अख्खा गरम मसाला (दालचिनी, लवंग, मोठी वेलची, काळी मिरी),
1 टेबलस्पून तुकडा काजू, 1 टेबलस्पून तूप, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, 2 टेबलस्पून टोमॅटो प्युरी, 2 टेबलस्पून किसलेलं खोबरं, स्वादानुसार मीठ.

कृती :
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात तमालपत्र आणि अख्खे गरम मसाले परतून घ्या. नंतर त्यात काजूचे तुकडे, टोमॅटो प्युरी, बिर्याणी मसाला, तांदूळ, मक्याचे दाणे, मिश्र भाज्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून मंद आचेवर शिजवा. तांदूळ शिजल्यानंतर त्यात किसलेलं खोबरं घाला आणि सर्व्ह करा.