कॉर्न लॉलीपॉप (Corn Lollipop)

कॉर्न लॉलीपॉप (Corn Lollipop)

कॉर्न लॉलीपॉप

साहित्य : 1 कप शिजवून अर्धवट भरडलेले मक्याचे दाणे, 3 उकडून कुस्करलेले बटाटे, 2 बे्रड स्लाइस, 2 टेबलस्पून कोथिंबीर, 2 टीस्पून कसुरी मेथी, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोर, 1 टीस्पून तंदुरी मसाला, एका लिंबाचा रस, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून धणे पावडर, 2 टीस्पून किसलेले चीज, 1 टीस्पून मिरचीची पेस्ट, थोडासा बारीक रवा, आइस्क्रीम स्टीक्स, चवीनुसार मीठ.

हिरव्या चटणीकरिता साहित्य : 2 कप कोथिंबीर, 2 टेबलस्पून शेंगदाणे, 1 टीस्पून धणे, एका लिंबाचा रस,
1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, थोडेसे पाणी.

कृती : मक्याचे दाणे, कुस्करलेले बटाटे, बे्रड स्लाइस, कोथिंबीर, कसुरी मेथी, कॉर्नफ्लोर, तंदूरी मसाला, चाट मसाला, लिंबाचा रस, धणे पावडर, चीज, मिरची पेस्ट हे सर्व साहित्य एकत्र करा. या मिश्रणाचे लंबगोल रोल तयार करा. हे रोल रव्यामध्ये घोळवा. हे गोळे गरम तेलात तळून घ्या व गरम असतानाच याला आइस्क्रीम स्टिक्स लावा. चटणीचे सर्व साहित्य एकत्र करा व मिक्सरमध्ये वाटून घ्या. या हिरव्या चटणीसोबत गरमागरम कॉर्न लॉलीपॉप सर्व्ह करा.