मक्याची कढी (Corn Kadhi)

मक्याची कढी (Corn Kadhi)

मक्याची कढी

साहित्य : पाव कप उकडलेले मक्याचे दाणे, 3 टेबलस्पून मक्याचं पीठ, 2 कप जाड ताक, 1 टीस्पून तेल, 1 टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून मेथीदाणे, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, काही कडिपत्त्याची पानं, स्वादानुसार मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : ताक आणि मक्याचं पीठ एकत्र चांगलं फेटून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, मेथीदाणे, हिंग आणि कडिपत्त्याची फोडणी करा. आता त्यात उकडलेले मक्याचे दाणे आणि ताक-मक्याच्या पिठाचं मिश्रण घालून आधी मोठ्या आचेवर आणि नंतर मंद आचेवर शिजवा. नंतर त्यात हळद आणि मीठ एकत्र करा. कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम मक्याची कढी जिरा राइससोबत सर्व्ह करा.