मक्याची डाळ (Corn Daal Recipe)
मक्याची डाळ (Corn Daal Recipe)

By Shilpi Sharma in द्रौपदीची थाळी
मक्याची डाळ
साहित्य : 250 ग्रॅम उकडून जाडसर वाटलेले मक्याचे दाणे, 1 टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून गरम मसाला पूड, 1 कप दूध, अर्धा कप पाणी,
1 टीस्पून साखर, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून दही, स्वादानुसार मीठ.
कृती : मक्याच्या वाटणात पाणी आणि दूध एकत्र करून मंद आचेवर शिजवून घ्या. दुसर्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात हिंग आणि जिरे-मोहरीची फोडणी द्या. आता त्यात मक्याचं मिश्रण, गरम मसाला, हळद आणि लाल मिरची पूड घाला. मीठ घालून मका शिजू द्या. साधारण पाच मिनिटांत तो शिजेल. नंतर आच बंद करून त्यात दही व साखर एकत्र करा आणि सर्व्ह करा.