कॉर्न-कर्ड करी (Corn Curd Curry)

कॉर्न-कर्ड करी (Corn Curd Curry)

कॉर्न-कर्ड करी

साहित्य : 250 ग्रॅम उकडलेले स्वीट कॉर्न, पाव कप कांद्याची पेस्ट, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हिंग, चिमूटभर वेलची पूड, पाव टीस्पून हळद, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 1 मोठी वेलची, 2 तेजपत्ते, 1 टीस्पून काळी मिरी पूड, 1 टीस्पून गरम मसाला पूड, 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा कप फेटलेलं घट्ट दही, स्वादानुसार मीठ,
2 टेबलस्पून फ्रेश क्रीम. 3 टेबलस्पून तेल.

कृती :
एका पॅनमध्ये तेल गरम करून, त्यात मक्याचे दाणे परतवून काढून घ्या. आता त्याच तेलामध्ये कांद्याची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट घालून परतवून घ्या. नंतर त्यात दही आणि तळलेले मक्याचे दाणे सोडून उर्वरित सर्व साहित्य घाला आणि 5 मिनिटं परतवा. आता त्यात दही आणि मक्याचे दाणे घालून मिश्रण दाट होईपर्यंत शिजवा. शेवटी फ्रेश क्रीम घालून सजवा आणि सर्व्ह करा.