मक्याची भेळ (Corn Bhel)

मक्याची भेळ (Corn Bhel)

मक्याची भेळ

साहित्य : 200 ग्रॅम उकडलेले स्वीट कॉर्न, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 उकडून बारीक चिरलेले बटाटे, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, अर्धा कप लहान चौकोनी तुकडे केलेलं पनीर, 2 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून भेळपुरीची बारीक शेव, काही भेळपुरीच्या पुर्‍या.

कृती : सर्व साहित्य एकत्र करून एकजीव मिश्रण तयार करा आणि सर्व्ह करा.