थंडगार व्हा : पान गुलकंद शेक (Cool Hour : Paan ...

थंडगार व्हा : पान गुलकंद शेक (Cool Hour : Paan Gulkand Shake)

उन्हाळ्याच्या मौसमात आपला दिवसभराचा थकवा काही क्षणात घालवायचा असल्यास पान गुलकंद शेकचा आस्वाद घ्या. विड्याची पानं, गुलकंद, मध आणि दूध यांचं मिश्रण असलेलं हे पेय तळपत्या उन्हातही थंडगार अनुभूती देतं.

साहित्य :

१० विड्याची पानं

४ टेबलस्पून गुलकंद

२ टेबलस्पून मध

४ कप थंड दूध

पाव कप मिक्स ड्रायफ्रूट्‌स (जाडसर किसलेले)

५-६ आइस क्यूब्स

कृती :

विड्याची पानं आणि अर्धा कप पाणी एकत्र करून मिक्सरमधे त्याची पेस्ट बनवा. गाळून वेगळी ठेवा. एका ग्लासमध्ये थंड दूध, पानाची पेस्ट, गुलकंद, मध, मिक्स ड्रायफ्रूट्‌स आणि आइस क्यूब्स घालून थंडगार पान-गुलकंद शेक सर्व्ह करा.