कूल फ्लेवर : स्पार्कलिंग कुकुंबर लाइमेड (Cool ...

कूल फ्लेवर : स्पार्कलिंग कुकुंबर लाइमेड (Cool Flavour: Sparkling Cucumber Limeade)

दिवसभराचा थकवा काही मिनिटांत घालवा. स्पार्कलिंग कुकुंबर लाइमेड बनवा. हे पेय आरोग्यदायी तर आहेच शिवाय अगदी कमी वेळात बनतं. काकडी, पुदिना आणि लिंबूच्या स्वादाचं हे पेय प्या आणि तजेलदारपणा अनुभवा.

साहित्य –

१ काकडी (स्लाइसमध्ये कापलेली)

१ कप साखर, १ कप लिंबाचा रस आणि पाणी

१ टीस्पून लिंबाचं साल

पाव कप पुदिन्याची पानं

२ कप सोडा वॉटर

कृती – एका पॅनमध्ये साखर, पाणी आणि लिंबाचं साल घालून मंद आचेवर उकळून घ्या.

नंतर साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा. मग आंचेवरून खाली उतरवा.

त्यात पुदिन्याची पानं घालून ३० मिनिटांपर्यंत झाकून ठेवा. हे पुदिना-साखरेचे सिरप ब्लेंडरमध्ये घालून त्याची मऊ पेस्ट बनवा. ही पेस्ट गाळून घ्या.

एका जारमध्ये पुदिना-साखरेचे सिरप, काकडीचे स्लाइस आणि लिंबाचा रस मिसळा.

नंतर १ तास फ्रिजमध्ये थंड होण्याकरिता ठेवा.

सर्व्ह करण्यापूर्वी ग्लासमध्ये अर्ध कुकुंबर लाइमेड घ्या. त्यात सोडा वॉटर घाला आणि थंड थंड सर्व्ह करा.