उन्हाळ्यातील थंडावा (Cool Delights In Summer)

उन्हाळ्यातील थंडावा (Cool Delights In Summer)

उन्हाच्या झळा तीव्र झाल्या की, थंड पदार्थांचा आस्वाद अपरिहार्य ठरतो, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. तेव्हा यंदाच्या उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी या कूल फ्लेव्हर्सचा आस्वाद जरूर घ्या.

फ्लेवर्ड आईस स्टिक्स
साहित्य : प्रत्येकी 10 मिलिलीटर ऑरेंज क्रश आणि संत्र्याचा रस, प्रत्येकी 20 मिलिलीटर कॅनबेरी ज्यूस आणि ब्ल्यू कुरॅको फ्लेव्हर सिरप, प्रत्येकी 10 मिलिलीटर किवीचा गर आणि किवी फ्लेव्हर सिरप, प्रत्येकी 10 मिलिलीटर स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी फ्लेव्हर सिरप, 100 मिलिलीटर पाणी, 50 मिलिलीटर लिंबाचा रस, 5 ग्रॅम चाट मसाला.
कृती : ऑरेंज लॉलीजसाठी : ऑरेंज क्रश, संत्र्याचा रस, चाट मसाला आणि पाणी यांचं एकजीव मिश्रण तयार करून कुल्फीच्या साच्यात भरा आणि सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या.
कॅनबेरी लॉलीजसाठी : कॅनबेरी ज्यूस, लिंबाचा रस, चाट मसाला आणि पाणी यांचं एकजीव मिश्रण तयार करून कुल्फीच्या साच्यात भरा आणि सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या.
ब्ल्यू कुरॅको लॉलीजसाठी : ब्ल्यू कुरॅको सिरप, लिंबाचा रस, चाट मसाला आणि पाणी यांचं एकजीव मिश्रण तयार करून कुल्फीच्या साच्यात भरा आणि सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या.
किवी लॉलीजसाठी : किवी क्रश, किवी फ्लेव्हर्ड सिरप, लिंबाचा रस, चाट मसाला आणि पाणी यांचं एकजीव मिश्रण तयार करून कुल्फीच्या साच्यात भरा आणि सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या.
स्ट्रॉबेरी लॉलीजसाठी : स्ट्रॉबेरी क्रश, स्ट्रॉबेरी फ्लेव्हर्ड सिरप, लिंबाचा रस, चाट मसाला आणि पाणी यांचं एकजीव मिश्रण तयार करून कुल्फीच्या साच्यात भरा आणि सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या.

गुलाबजाम आइस्क्रीम
साहित्य : 1 लीटर दूध, 1 कप फ्रेश क्रीम, 1 टीस्पून व्हेनिला इसेन्स, अर्धा टीस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा कप साखर, 10 लहान गुलाबजाम, थोडा बारीक केलेला पिस्ता.
कृती : 2 टेबलस्पून दुधामध्ये कॉर्नफ्लोअर मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. उर्वरित दूध गरम करत ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण मिसळून मंद आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण दाट झालं की, त्यात साखर मिसळून ती विरघळली की आच बंद करा. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतर ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. नंतर आइस्क्रीमच्या ट्रेमध्ये ठेवून एकसमान करा आणि तीन तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. तीन तासांनंतर त्यात फ्रेश क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स मिसळून पुन्हा ब्लेंडरने ब्लेंड करा. आता आइस्क्रीम ट्रेमध्ये तळाला सर्वप्रथम गुलाबजामचा थर (थोडे गुलाबजाम बाजूला काढून ठेवा) लावा. त्यावर ब्लेंड केलेलं आइस्क्रीमचं मिश्रण घाला. उर्वरित गुलाबजाम कुस्करून त्यावर घाला. वरून पिस्त्याचे तुकडे भुरभुरा. आइस्क्रीम ट्रेला झाकण लावून किमान आठ-दहा तास सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या. सेट झाल्यानंतर आइस्क्रीमचे स्लाइस करून थंडगार सर्व्ह करा.

गुलकंद मूस
साहित्य : 500 मिलिलीटर फ्रेश क्रीम, 2 टीस्पून थंडाई पावडर, 70 ग्रॅम गुलकंद, 100 मिलिलीटर कंडेंस्ड मिल्क, 150 मिलिलीटर दूध, 10-12 पिस्ते बारीक चिरलेले.
कृती : मिक्सरमध्ये दूध आणि थंडाई पावडर घालून ब्लेंड करा. एका बाऊलमध्ये कंडेंस्ड मिल्क, थंडाईमिश्रित दूध आणि फ्रेश क्रीम एकत्र करून, ते अगदी स्मूद होईपर्यंत फेटा. आता सर्व्हिंग ग्लासमध्ये सर्वप्रथम थोडं दुधाचं मिश्रण घाला. त्यावर गुलकंदाचा थर पसरवून, त्यावर पिस्त्याचे तुकडे घालून सजवा. पुन्हा याप्रमाणे दुधाचं मिश्रण, गुलकंद आणि पिस्त्याचा थर लावा आणि हा ग्लास एक-दोन तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. सर्व्ह करण्याच्या 15 मिनिटांपूर्वी ग्लास फ्रीजमधून बाहेर काढा.