सफरचंदाचं सरबत (Cool Apple Sarbat)

सफरचंदाचं सरबत (Cool Apple Sarbat)

सफरचंदाचं सरबत

 

साहित्य : अर्धा किलो सफरचंद, अर्धा किलो साखर.

कृती : सफरचंदाची सालं तासून, त्याचे लहान लहान तुकडे करून घ्या. 200 मिलिलीटर पाण्यामध्ये हे तुकडे घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्या. सफरचंदाच्या रसामध्ये साखर घालून, साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्या. हे मिश्रण पुन्हा एकदा गाळून, हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. हे सरबत 10 ते 15 दिवस चांगलं टिकतं. दररोज त्याचं थोडं थोडं सेवन करता येईल. लाभ हृदयाला बळ देतं, हृदयविकार दूर ठेवतं. शरीर पुष्ट आणि सुडौल बनवतं. अशक्तपणा, थकवा दूर करून मनात उत्साह भरतं. अतिसार व उलटी होत असल्यास लगेच आराम देतं. पित्त दोषांवर लाभदायक आहे. लहान मुलं, तरुण, स्त्री-पुरुष, आजी- आजोबा अशा प्रकारे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती वर्षभरात कधीही या सरबताचं सेवन करू शकतात.