नारळाच्या दुधातले मोदक (Coconut Milk Modak)

नारळाच्या दुधातले मोदक (Coconut Milk Modak)

साहित्य : पारीसाठी : 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप पाणी, अर्धा कप नारळाचं दूध, 1 चमचा साखर, 2 चमचे लोणी, चिमूटभर मीठ.
सारणासाठी : नेहमीप्रमाणे ओल्या नारळाचं खोबरं आणि गुळाचं सारण तयार करून घ्या.
कृती : 1 कप पाणी उकळवून त्यात नारळाचं दूध, साखर, लोणी आणि मीठ एकत्र करा. मिश्रणाला उकळी आली की, त्यात तांदळाचं पीठ घालून उकड काढून घ्या. हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर व्यवस्थित मळून घ्या. तांदळाच्या पिठाच्या पारी तयार करून त्यात गूळ-खोबर्‍याचं मिश्रण भरा आणि मोदक तयार करा. मोदक पात्रातून हे मोदक उकडून घ्या.