कोकोनट बर्फी (Coconut Burfi)

कोकोनट बर्फी (Coconut Burfi)

कोकोनट बर्फी

साहित्य : 2 नारळ, 1 कप पिठीसाखर, 1 टेबलस्पून वेलची पूड, 3 टेबलस्पून साजूक तूप, 1 टेबलस्पून पिस्त्याचे काप.

कृती : नारळ फोडून खोवून घ्या. खालचं काळं खोबरं बाजूला करा. फक्त पांढरं खोबरं घ्या. खोबरं अगदी एक सेकंद मिक्सरमधून वाटून घ्या. ते जाडसरच राहिलं पाहिजे. नंतर गॅसवर कढई ठेवा. त्यात तूप घालून त्यावर खोबरं दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्या. नंतर त्यात पिठीसाखर घालून मिश्रण चांगलं ढवळत राहा. मग त्यात वेलची पूड घाला. कढईत मिश्रण सुटू लागेपर्यंत ते एकजीव करा. नंतर एका ताटाला तूप लावून खोबर्‍याचं मिश्रण ताटावर पसरवा. चांगलं सेट करून त्यावर पिस्त्याचे काप घाला. मग फ्रिजमध्ये किंवा अर्धा तास बाहेरच ठेवा. नंतर चाकूने त्याचे चौकोनी काप करा. तयार कोकोनट बर्फी सर्व्ह करा. दोन नारळाच्या पंधरा ते अठरा बर्फी तयार होतील.
टीप : मिश्रण कढईत सतत ढवळत राहा नाहीतर ते कढईला लागण्याची शक्यता असते.