नारळ भेंडी (Coconut Bhendi)

नारळ भेंडी (Coconut Bhendi)

नारळ भेंडी

साहित्यः 500 ग्रॅम भेंडी (उभी चिरलेली), 2 कप किसलेला ओला नारळ, 2 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून धणे-जिरे पूड, 2 टीस्पून एव्हरेस्ट शाही गरम मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार.

कृतीः पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व हिंग टाका. जिरे तडतडल्यानंतर भेंडी, हळद व मीठ टाका. 5-7 मिनिटे शिजवा. एका भांड्यात खोबरं, एव्हरेस्ट शाही गरम मसाला, धणे पूड, लाल मिरची पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. हे मिश्रण भेंड्यात टाकून 2 मिनिटे शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.