कोकोनट बॉल विथ स्ट्रॉबेरी रबडी (Coconut Ball Wi...

कोकोनट बॉल विथ स्ट्रॉबेरी रबडी (Coconut Ball With Strawberry Rabadi)

कोकोनट बॉल विथ स्ट्रॉबेरी रबडीसाहित्य :
  1 लीटर दुधाची रबडी, 1 कप स्ट्रॉबेरीचा गर, 1 कप नारळाचा चव, पाव कप कंडेंस्ड मिल्क, थोडे सुकामेव्याचे पातळ काप.

कृती :  रबडीमध्ये स्ट्रॉबेरीचा गर घालून एकजीव मिश्रण तयार करा आणि थंड होण्याकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्या. नारळाचा चव व कंडेंस्ड मिल्क यांचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. त्याचे लहान-लहान गोळे तयार करा. सर्व्हिंग डिशमध्ये सर्वप्रथम कोकोनट बॉल्स घाला. त्यावर थोडं रबडी-स्ट्रॉबेरीचं पसरवून, वरून सुकामेव्याचे काप घाला आणि सर्व्ह करा.