चुरमा लाडू (Churmaa Laddu)

चुरमा लाडू (Churmaa Laddu)

चुरमा लाडू

साहित्य : 1 कप गव्हाचं रवाळ पीठ, 1 कप पिठीसाखर, चिमूटभर मीठ, 1 कप तेल, तळण्यासाठी साजूक तूप, 1 टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून जायफळ पूड.

कृती : सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून, ते पूर्णपणे थंड करून घ्या. एका परातीत गव्हाचं पीठ, मीठ आणि तेलाचं मोहन घालून घट्ट कणीक मळा. ही कणीक 10 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्या. नंतर त्याच्या लहान लहान मुठिया वळून गरम तुपात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. मुठिया साधारण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हे पीठ चाळणीतून चाळून घ्या. पीठ व्यवस्थित बारीक व्हायला हवं. आता हे बारीक केलेलं पीठ परातीत घेऊन, त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि जायफळ पूड मिसळून चांगलं एकजीव मिश्रण तयार करा. आवश्यकता भासल्यास त्यात आणखी थोडं साजूक तूप मिसळून मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या.