केक पॉप्स (Christmas Party Recipe : Cake Pops)

केक पॉप्स (Christmas Party Recipe : Cake Pops)

केक पॉप्स – Cake Pops

Cake Pops

साहित्य
: स्पाँज केक, क्रीम, वितळवलेलं चॉकलेट, कँडी स्टिक्स, स्प्रिंकलर्स.

कृती : स्पाँज केकचा हाताने चुरा करून घ्या. केकचा चुरा एकत्र बांधलेला राहील, इतकं त्यात आपल्या आवडीचं क्रीम घाला आणि एकजीव मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे वळून 15 मिनिटांकरिता फ्रीजमध्ये ठेवा. कँडी स्टिक्सला थोडं वितळवलेलं चॉकलेट लावून त्यावर केकचे गोळे लॉलीपॉपप्रमाणे लावा. नंतर हे पॉप्स व्हाईट किंवा डार्क चॉकलेटमध्ये घोळवून घ्या. हे केक पॉप्स एका स्टँडवर रोवून उभे करून ठेवा. त्यावर विविधरंगी स्प्रिंकलर्स घालून सजवा. चॉकलेट कडक झालं की सर्व्ह करा.