चॉकलेट शंकरपाळे (Chocolate Shankarpale)

चॉकलेट शंकरपाळे (Chocolate Shankarpale)

चॉकलेट शंकरपाळे


साहित्य : अर्धा वाटी कोको पावडर, अर्धा वाटी मिल्क पावडर, 1 वाटी मैदा, अर्धा वाटी पिठीसाखर, 2 चमचे सॉल्टेड बटर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा वाटी दूध, पाव वाटी तेल, तळण्यासाठी तूप.

कृती : मैदा, कोको पावडर, पिठीसाखर, मिल्क पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. नंतर त्यात सॉल्टेड बटर आणि थोडं दूध घालून मिश्रण चांगलं मळून घ्या. नंतर त्याची पोळी लाटा. पोळीवर तेल लावा आणि त्यावर थोडा मैदा भुरभुरा. आता पोळीची घडी करून पुन्हा लाटा. नंतर त्याचे हव्या त्या आकारात शंकरपाळे कापून, गरम तुपात मंद आचेवर तळा.