चॉकलेट मूस (Chocolate Moose)

चॉकलेट मूस (Chocolate Moose)

चॉकलेट मूस

साहित्य : अडीच कप दूध, 10 टीस्पून कोको पावडर, 100 ग्रॅम किसलेली डार्क चॉकलेट, 10 ग्रॅम चायना ग्रास, 2 टीस्पून कस्टर्ड पावडर, 200 ग्रॅम फेटलेली फ्रेश क्रीम,
1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 2 टेबलस्पून साखर.

कृती :
एक कप थंड पाण्यात चायना ग्रास तासभर भिजत ठेवा. मंद आचेवर विरघळेपर्यंत शिजत ठेवा. आता दुसर्‍या पॅनमध्ये एक कप दुधात साखर, कोको पावडर आणि डार्क चॉकलेट घालून मंद आचेवर गरम करत ठेवा. मिश्रणाला उकळी आली की, आच बंद करा. उर्वरित दुधात कस्टर्ड पावडर घालून एकजीव मिश्रण तयार करा. पॅनमध्ये कस्टर्डचं मिश्रण गरम करत ठेवा. मिश्रणाला उकळी आली की, त्यात कोको-चॉकलेटचं मिश्रण मिसळून मिनिटभर शिजवा. त्यात चायना ग्रासचं मिश्रण घालून दोन मिनिटं शिजवा. आता हे मिश्रण आचेवरून उतरवून थंड होण्यासाठी ठेवून द्या. मिश्रण थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात फ्रेश क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स मिसळून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये भरून छान सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.