चॉकलेट मोदक (Chocolate Modak)

चॉकलेट मोदक (Chocolate Modak)

चॉकलेट मोदक


साहित्य : 1 कंडेन्स्ड मिल्कचा टिन, 1 कप
कोको पावडर, 100 ग्रॅम बटर, अर्धा कप बदामाचे बारीक तुकडे.
कृती : बटर आणि कोको पावडर एकत्र करून जाड बुडाच्या पॅनमध्ये मध्यम आचेवर ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. थोड्या वेळाने ते दाट होईल. नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि बदामाचे तुकडे घालून मिश्रण गोळा होईपर्यंत सतत ढवळत शिजवा. नंतर हे मिश्रण आचेवरून उतरवून थोडं थंड होऊ द्या. मिश्रण थोडं थंड झालं की, ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यामध्ये दाब देऊन भरा आणि मोदक तयार करा.