चॉकलेट फज (Chocolate Fudge)

चॉकलेट फज (Chocolate Fudge)

चॉकलेट फज

साहित्य : 200 ग्रॅम कुकिंग चॉकलेटचे तुकडे, 200 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 2 टेबलस्पून बटर, अर्धा कप बदाम-काजू-पिस्ताचे बारीक तुकडे.

कृती : चॉकलेट डबल बॉयलरच्या साहाय्याने विरघळून घ्या. त्यात उर्वरित सर्व साहित्य घालून एकजीव करा. आता एका ट्रेला बटरचा हात लावून त्यात हे चॉकलेटचं मिश्रण पसरवा. सेट होण्यासाठी ते साधारण पाच मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर फ्रीजमधून काढून आवडीनुसार आकारात कापा आणि सर्व्ह करा.