चॉकलेट चीप मफिन्स (Chocolate Chip Muffinns)

चॉकलेट चीप मफिन्स (Chocolate Chip Muffinns)

चॉकलेट चीप मफिन्स

साहित्य : 2 कप मैदा, 1 कप पिठीसाखर, 2 टीस्पून बेकिंग पावडर, 60 ग्रॅम बटर (विरघळलेलं), 2 अंडी (फेटलेली), 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 100 ग्रॅम चॉकलेट चिप्स.

कृती : ओव्हन 180 डिग्री सेल्सियसवर प्रीहिट करून घ्या. मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. त्यात पिठीसाखर घालून व्यवस्थित एकत्र करा. दुसर्‍या बाऊलमध्ये विरघळलेलं बटर, दूध, अंडी आणि व्हॅनिला इसेन्स चांगलं एकजीव करून घ्या. आता त्यात हळूहळू मैद्याचं मिश्रण घालून एकजीव करा. मिश्रण चांगलं फेटून घ्या. त्यात चॉकलेट चिप्स एकत्र करा. कपकेकच्या साच्यामध्ये कपकेक लायनर लावून त्यात हे मिश्रण अर्ध्याहून थोडं जास्त भरा. ते 180 डिग्री प्रीहिटेड ओव्हनमध्ये 10 ते 12 मिनिटं बेक करा. कपकेक बेक झाल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्या.