चॉकलेट अँड बनाना पॅनकेक (Chocolate And Banana P...

चॉकलेट अँड बनाना पॅनकेक (Chocolate And Banana Pancake)

चॉकलेट अँड बनाना पॅनकेकसाहित्य :
3 केळी, 6 टेबलस्पून संत्र्याचा रस, 1 टीस्पून संत्र्याच्या सालांचा कीस, 2 टेबलस्पून ऑरेंज लिकर. हॉट चॉकलेट सॉससाठी ः 1 टेबलस्पून कोको पावडर, 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर, 3 टेबलस्पून दूध, 40 ग्रॅम डार्क चॉकलेट (तुकडे केलेली), 15 ग्रॅम बटर, 150 ग्रॅम गोल्डन सिरप (बाजारात उपलब्ध), अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स.

पॅनकेकसाठी :
100 ग्रॅम मैदा, 1 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून तेल, थोडं दूध, शेकण्यासाठी तेल.

कृती
: एका वाडग्यात संत्र्याचा रस, संत्र्याची सालं आणि ऑरेंज लिकर एकत्र करा. त्यात केळीच्या फोडी एकत्र करा. दुसर्‍या वाडग्यात कोको पावडर, कॉर्नफ्लोअर आणि दूध घालून एकजीव मिश्रण तयार करा. आता एका पॅनमध्ये बटर, डार्क चॉकलेट आणि गोल्डन सिरप घालून चांगलं एकजीव करा. मिश्रण सतत ढवळत राहा. त्यात कोको पावडर-कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालून दाट होईपर्यंत शिजवा. नंतर मिश्रण आचेवरून खाली उतरवून त्यात व्हॅनिला इसेन्स मिसळा. पॅनकेकसाठीचं सर्व साहित्य एकत्र करून एकजीव मिश्रण तयार करा.
आता नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल घालून, त्यावर पॅनकेकसाठीचं मिश्रण घालून पसरवा. मंद आचेवर पॅनकेक तपकिरी रंगाचा होईपर्यंत शेकवा. सर्व्ह करण्यापूर्वी चॉकलेट सॉस गरम करा. गरमागरम पॅनकेकवर गरम चॉकलेट सॉस पसरवा. त्यावर केळ्याच्या स्लाइसचं मिश्रण पसरवून पॅनकेक मध्यभागी दुमडा. त्यावर पुन्हा चॉकलेट सॉस घालून सजवा आणि सर्व्ह करा.