चोको वॉलनट टार्ट (Choco Walnut Tart)

चोको वॉलनट टार्ट (Choco Walnut Tart)

चोको वॉलनट टार्टसाहित्य : टार्टसाठी :
1 कप मैदा, अर्धा कप बटर, अर्धा टेबलस्पून पिठीसाखर, पाव टीस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, 4 टेबलस्पून थंड पाणी.

चोको वॉलनट फिलिंगसाठी :
100 ग्रॅम डार्क चॉकलेट (किसलेलं), 3-4 अक्रोडाचे बारीक केलेले तुकडे, सजावटीसाठी थोडे अख्खे अक्रोड.

कृती :
ओव्हन 230 डिग्री सेल्सियसवर प्रीहिट करा. मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि पिठीसाखर एकत्र चाळून घ्या. त्यात बटर आणि थंड पाणी मिसळून कडक कणीक मळा. कणीक 20 मिनिटांकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर त्याच्या लहान-लहान पुर्‍या लाटा. बिस्कीट कटरच्या साहाय्याने त्याला योग्य तो आकार देऊन, टार्ट तयार करा. प्रीहिटेड ओव्हनमध्ये हे टार्ट 10-15 मिनिटं बेक करा. नंतर ओव्हनमध्ये किंवा डबल बॉयलरमध्ये डार्क चॉकलेट विरघळून घ्या. त्यात अक्रोडाचे तुकडे मिसळून फिलिंग तयार करा. बेक केलेल्या टार्टमध्ये हे फिलिंग भरून त्यावर अक्रोडाचे अख्खे तुकडे ठेवून सजवा आणि सर्व्ह करा.