चिकन विंग्ज विथ मँगो सॉस आणि चिकन पिकल (Chicken...

चिकन विंग्ज विथ मँगो सॉस आणि चिकन पिकल (Chicken Wings And Pickle)

चिकन विंग्ज विथ मँगो सॉस


साहित्य : 8 ते 10 चिकन विंग्ज, तळण्यासाठी तेल, 1 टेबलस्पून बटर, 1 कप मँगो प्युरी, पाव कप हॅबॅनेरो सॉस, अर्धा कप हॉट सॉस, 1 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून मिरे पावडर, 1 टीस्पून व्हिनेगर, चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून मैदा. स्पाईस मिक्ससाठी साहित्य ः 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून पॅपरिका पावडर, 2 टेबलस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून मिरे पावडर, चवीपुरते मीठ.
एग मिक्ससाठी साहित्य : 1 अंडे, 2 टेबलस्पून हॉट सॉस, 3 टेबलस्पून दूध, 2 टेबलस्पून स्पाईस मिक्स.
कृती : पॅनमध्ये बटर गरम करा. त्यामध्ये मँगो प्युरी, हॅबॅनेरो सॉस, हॉट सॉस, साखर, मिरे पावडर आणि व्हिनेगर घाला. चवीपुरते मीठ घाला. मँगो सॉस तयार आहे. एका बाऊलमध्ये स्पाईस  मिक्सचे साहित्य एकत्र करून ठेवा. अजून एक बाऊल घेऊन त्यात एग मिक्सचे सर्व साहित्य एकत्र करून ठेवा. एका बाऊलमध्ये मैदा आणि स्पाईस मिक्स एकत्र करून ठेवा.
1 चिकन विंग घेऊन एग मिक्समध्ये घोळवून नंतर मैद्याच्या मिश्रणात बुडवून बाजूला ठेवा. असे सर्व विंग्ज तयार मांडून ठेवा. नंतर मध्यम आचेवर एक-एक विंग तळून काढा. डिशमध्ये चिकन विंग्ज सोबत मँगो सॉस सर्व्ह करा.

चिकन पिकल


साहित्य : 1 किलो बोनलेस चिकन, पाऊण कप व्हिनेगर, 1 तमालपत्र, 1 टेबलस्पून मोहरी डाळ, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून मेथी दाणे, 1 काळी मोठी वेलची, 1 इंच दालचिनी, 8 ते 10 लवंगा, 1 टेबलस्पून मिरे, दीड कप तेल, 4 कांदे (काप करून), अर्धा कप आलं-लसूण पेस्ट, पाव कप हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून हळद, पाव कप तिखट पावडर, तीन ते चार लिंबांचा रस.
कृती : बोनलेस चिकन धुऊन, कोरडे करून 2 तास व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवा. सर्व मसाल्याचे पदार्थ भाजून घ्या आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर पॅनमध्ये तेल तापवून कांद्याचे काप सोनेरी रंगावर परतून घ्या. त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि आलं लसणाची पेस्ट मिसळून चांगले परता. आता व्हिनेगरमधून बोनलेस चिकन काढून पॅनमध्ये इतर गरम मसाल्यांसोबत परतून नीट शिजवा. शेवटी लिंबाचा रस घालून नीट एकजीव होऊ द्या.