चिकन टिक्का तवा पुलाव (Chicken Tikka Tava Pulav)

चिकन टिक्का तवा पुलाव (Chicken Tikka Tava Pulav)

चिकन टिक्का तवा पुलाव


साहित्य : पाव किलो तयार चिकन टिक्का, 3 कप शिजवलेला भात, 2-3 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरे, पाव कप टोमॅटो प्युरी, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 1 टीस्पून पावभाजी मसाला, अर्धी सिमला मिरची चिरलेली, 2-3 टेबलस्पून मटार, थोडी चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून जिरं, कांदा चांगला परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट परतवा. मग टोमॅटो प्युरी, मिरची पूड घालून शिजवा. आता त्यात पाव भाजी मसाला, सिमला मिरची, मटार आणि मीठ घाला. त्यात 3-4 टेबलस्पून पाणी घालून मिनिटभर शिजू द्या. शेवटी त्यात भात आणि चिकन टिक्का एकत्र करून मिनिटभर शिजू द्या. चिकन टिक्का तवा पुलाव गरमच वाढा.