चिकन टिक्का मसाला (Chicken Tikka Masala)

चिकन टिक्का मसाला (Chicken Tikka Masala)

चिकन टिक्का मसाला

साहित्य : टिक्कासाठी : 1 किलो बोनलेस चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे, अर्धा कप घट्ट दही, दीड टीस्पून मीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरे पूड.
ग्रेव्हीसाठी : 4 टेबलस्पून तूप, 1 कांदा बारीक चिरलेला, सव्वा टीस्पून गरम मसाला, सव्वा टीस्पून धणे पूड, दीड टीस्पून जिरे पूड, 2 कप चिरलेले टोमॅटो, सव्वा कप फ्रेश क्रीम, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून साखर, पाव टीस्पून काळी मिरी पूड, पाव कप चिरलेली कोथिंबीर.
कृती : एका मोठ्या वाडग्यामध्ये दही, मीठ आणि टिक्क्यासाठीचे मसाले एकत्र करून चांगले फेटा. त्यात चिकन घालून व्यवस्थित एकत्र करा. झाकण लावून हे चिकन किमान तासभर मॅरिनेट होण्यासाठी ठेवा. रात्रभर ठेवल्यास उत्तम. नंतर हे चिकन ग्रील करून घ्या.
आता एका मोठ्या जाड बुडाच्या भांड्यामध्ये मध्यम आचेवर तूप गरम करा. त्यात कांदा आणि आलं घालून 5-7 मिनिटं परतवा. कांदा गुलाबी व्हायला हवा. नंतर त्यात सर्व मसाले घालून 2 मिनिटं परतवा. त्यात टोमॅटो, क्रीम, मीठ, साखर, काळी मिरी आणि अर्धा कप पाणी एकत्र करा. मिश्रणाला उकळी आली की, आच मंद करून मिश्रण दाट होईपर्यंत, साधारण
15 मिनिटं शिजवा. नंतर त्यात चिकन टिक्का घालून झाकण लावून काही मिनिटं शिजवा. गरमागरम चिकन टिक्का मसाला कोथिंबीर घालून सर्व्ह करा.