चिकन तवा पुलाव (Chicken Tawa Pulav)

चिकन तवा पुलाव (Chicken Tawa Pulav)

चिकन तवा पुलाव

साहित्य : 400 ग्रॅम बोनलेस चिकन लहान तुकडे कलेलं, 3 कप शिजवलेला भात, 1 टेबलस्पून तेल, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 3 टोमॅटो चिरलेले, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून धणे पूड, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, अर्धा टीस्पून जिरे पूड, 1 सिमला मिरची, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून बटर, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : एका नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा चांगला परतवा. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परतवा. नंतर त्यात टोमॅटो घाला आणि ते नीट शिजू द्या. त्यात मिरची पूड, धणे पूड, पावभाजी मसाला आणि जिरे पूड घालून एकत्र करा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवा. आता त्यात थोडं पाणी घाला. मग चिकन आणि सिमला मिरची घाला. मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा आणि चिकन नीट शिजू द्या. चिकन शिजल्यानंतर त्यात भात घाला हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करा. वरून चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.