चिकन सॅलड (Chicken Salad)

चिकन सॅलड (Chicken Salad)

साहित्य : 100 ग्रॅम चिकन, 6-7 सॅलडची पाने, 2 उकडलेली अंडी स्लाइस करून घेतलेली, प्रत्येकी 1-1 लाल आणि पिवळी सिमला मिरची, 1 टीस्पून व्हिनेगर, 1 टीस्पून राईची पावडर, अर्धा टीस्पून काळी मिरीची पावडर, मीठ चवीनुसार, थोडी साखर, थोडे सॅलड ऑइल (बाजारात उपलब्ध असते नाही तर तुम्ही  ऑलिव्ह ऑइल देखील वापरू शकता.)
कृती : व्हिनेगर, मीठ, साखर, मिरपूड, मोहरी पावडर आणि सॅलड ऑइल एकत्र करा. त्यात चिकन मॅरीनेट करून ग्रील करा. सॅलडची पाने थंड पाण्याने धुवा आणि त्याचे तुकडे करा. आता एका प्लेटमध्ये अंडी, ग्रील्ड चिकन, सॅलडची पाने, शिमला मिरची वेगवेगळे अ‍ॅरेंज करून सर्व्ह करा.