चीजी आल्मंड पोटॅटो पॉपकॉर्न (Cheesy Almond Pota...

चीजी आल्मंड पोटॅटो पॉपकॉर्न (Cheesy Almond Potato Popcorn)

चीजी आल्मंड पोटॅटो पॉपकॉर्न

साहित्य : दीड कप उकडून कुस्करलेले बटाटे, अर्धा कप किसलेलं चीज, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण, पाव कप बारीक चिरलेला कांदा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडा बारीक चिरलेला पुदिना, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टेबलस्पून बारीक चिरलेले बदाम, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : तेल सोडून उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्या. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम चीजी आल्मंड पोटॅटो पॉपकॉर्न हिरवी चटणी आणि वाफाळत्या चहासोबत सर्व्ह करा.