चीज उत्तपम आणि मैसूर मसाला बोंडा (Cheese Uttapa...

चीज उत्तपम आणि मैसूर मसाला बोंडा (Cheese Uttapam And Mysore Masala Bonda)

चीज उत्तपम

साहित्य : 3 कप तांदूळ, प्रत्येकी 1-1 कप उडदाची डाळ आणि उकडीचे तांदूळ, अर्धा कप दही, चवीनुसार मीठ, 1 कांदा, 1 सिमला मिरची, 1 गाजर (तिन्ही बारीक चिरून घ्या) , 1 टीस्पून ऑरिगॅनो, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, पाव कप मक्याचे दाणे, चवीनुसार पिझ्झा स्प्रेड, 4-5 चीज क्यूब्स, तेल.

कृती :
तांदूळ आणि डाळ 7-8 तासांकरिता भिजवून ठेवा. नंतर त्यामधील पाणी काढून मिक्सरमधून वेगवेगळे वाटून घ्या. नंतर दोन्ही तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं वाटण एकत्र करा. या बॅटरमध्ये दही घालून व्यवस्थित फेटा. आता हे बॅटर 6-7 तासांकरिता झाकून ठेवा. नंतर या पेस्टमध्ये सर्व चिरलेल्या भाज्या घाला. मीठ घाला. नंतर नॉनस्टिक तव्यावर तेल लावून 1 टेबलस्पून बॅटर त्यावर पसरवा. मंद आचेवर ते चांगले शेकून घ्या. त्यावर पिझ्झा स्प्रेड पसरवा आणि वरून चीज किसून घाला. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स वरून भुरभुरा. चीज वितळले की गरमागरम चीज उत्तपम सर्व्ह करा.

 

मैसूर मसाला बोंडा

साहित्य : 1 कप मैदा, पाव कप तांदळाचं पीठ, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा कप दही, गरजेनुसार पाणी, 1 टीस्पून आलं बारीक केलेलं, 1 कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून कोथिंबीर (ह्या तीन गोष्टी बारीक चिरून घ्या.), तळण्यासाठी तेल.

कृती : एका बाऊलमध्ये मैदा, तांदळाचं पीठ, दही, बेकिंग सोडा, मीठ, हिरवी मिरची, आलं, कांदा आणि जिरं एकत्र करून त्याचं घट्टसर मिश्रण बनवून घ्या. गरजेनुसार पाणी त्यात घालून मिश्रण चांगलं फेटा. नंतर बाऊलवर झाकण घालून 20 मिनिटं तसंच ठेवा. नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मध्यम आकाराचे बोन्डे (वडे) बनवून घाला. ते सोनेरी रंगाचे होईस्तोवर तळून घ्या. तयार बोन्डे खोबर्‍याच्या चटणीसोबत खा.