चीज ऑनियन रोल (Cheese Onion Roll)

चीज ऑनियन रोल (Cheese Onion Roll)

चीज ऑनियन रोल (Cheese Onion Roll)

Cheese Onion Roll

साहित्य
: अर्धा कप चीज, 3 कांदे (उभे पातळ चिरलेले), 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), स्वादानुसार मीठ व पांढरी मिरी पूड, 100 ग्रॅम मैदा, मोहनासाठी थोडं तूप, अर्धी वाटी बेसन, तळण्याकरिता तेल.
कृती : पॅनमध्ये चीज विरघळवून त्यात कांदा परतवून घ्या. त्यात पांढरी मिरी पूड, मीठ व हिरवी मिरची एकत्र करून आचेवरून उतरवा. मैद्यामध्ये थोडं तुपाचं मोहन, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. या पिठाच्या पुर्‍या लाटून त्यामध्ये कांद्याचं मिश्रण भरा आणि रोल तयार करा. हे रोल बेसनामध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.