चीझ कॉर्न टिक्की (Cheese Corn Tikki)

चीझ कॉर्न टिक्की (Cheese Corn Tikki)

चीझ कॉर्न टिक्की


साहित्य : 100 ग्रॅम उकडून जाडसर वाटलेले स्वीट कॉर्न, 2 टेबलस्पून किसलेलं शेडर चीझ, 50 ग्रॅम किसलेलं पनीर, 1 टीस्पून जिरे पूड,
1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून गरम मसाला पूड, स्वादानुसार मीठ, 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.
कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्याचं एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या टिक्क्या बनवून गरम तेलात तळून घ्या. गरमागरम चीझ कॉर्न टिक्की पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.