चटपटीत स्वाद : आवळ्याचे आंबट-गोड लोणचे (Chatpat...

चटपटीत स्वाद : आवळ्याचे आंबट-गोड लोणचे (Chatpata Swad : Amle Ka Khatta-Meetha Achar)

 

आवळा आरोग्यासाठी जितका फायदेशीर असतो, तितकाच खाण्यासाठी स्वादिष्ट असतो. आवळ्यामध्ये अधिक प्रमाणात क जीवनसत्त्व असते. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच आपल्या आहारामध्ये आवळा जरूर असावा, आज आपण आवळ्याचं आंबट-गोड लोणचं कसं करायचं ते पाहूया.

फोटो सौजन्य – झायका रेसिपीज

 

साहित्य :

अर्धा किलो आवळा

१०० ग्रॅम गुळ (किसून घेतलेला)

आल्याचा एक मोठा तुकडा

७-८ हिरव्या मिरच्या

२ टीस्पून व्हिनेगर, मीठ चवीनुसार

प्रत्येकी अर्धा – अर्धा टीस्पून हळद, हिंग आणि कलौंजी (कांद्याचं बी)

प्रत्येकी १-१ टीस्पून राई, लाल मिरची पावडर, मेथीदाणे आणि बडीशेप

३ टेबलस्पून तेल

 

कृती –

आवळे स्वच्छ धुऊन घ्या.

कुकरमध्ये आवळे आणि दीड कप पाणी घालून ३-४ शिट्या करून आवळे शिजवून घ्या.

थंड झाल्यानंतर आवळ्यांतील बी काढून आवळ्याचे तुकडे कापून घ्या.

मिक्सरमध्ये आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घ्या.

आता कढईत सर्व मसाले घालून २ मिनिटे भाजून घ्या.

नंतर कढईमध्ये तेल गरम करून पाव-पाव टीस्पून मेथीचे दाणे, बडीशेप आणि कलौंजी घालून सुगंध येईपर्यंत परतून घ्या.

मग आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या.

शिजवून घेतलेले आवळे, वाटलेली मसाला पावडर आणि गुळ मिसळून थोडा वेळ शिजवा. नंतर व्हिनेगर घालून २ मिनिटं अजून शिजवा.

आता आच बंद करा.

व्यवस्थित थंड झाल्यानंतर काचेच्या जारमध्ये भरून ठेवा.