काजू-पिस्ता रोल (Cashew And Pistachio Roll)

काजू-पिस्ता रोल (Cashew And Pistachio Roll)

काजू-पिस्ता रोल (Cashew And Pistachio Roll)

काजू-पिस्ता रोल, Cashew And Pistachio Roll

साहित्य :
1 कप काजूची पूड, 1 कप पिस्त्याची पूड, 1 चिमूट खायचा हिरवा रंग, सजावटीसाठी चांदीचा वर्ख.

साखरेच्या पाकासाठी :
अर्धा कप साखर, पाव कप पाणी, 1 टीस्पून वेलची पूड.

कृती :
 साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवा. साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्या. त्यात वेलची पूड मिसळून पुन्हा एक उकळी आणा आणि आच बंद करा. साखरेच्या पाकाचे दोन समान भाग करा. आता एका भागात काजूची पूड मिसळा आणि चांगलं मळून घ्या. साखरेच्या पाकाच्या दुसर्‍या भागात पिस्त्याची पूड आणि हिरवा रंग एकजीव करून तेही मळून घ्या. आता पिस्त्याच्या गोळ्याचे लांबट लहान रोल करा. त्यावर काजूचं मिश्रण गुंडाळून रोल तयार करून घ्या. त्यावर चांदीचा वर्ख गुंडाळून तासभर बाजूला ठेवून द्या.
नंतर या रोलचे साधारण एक इंच आकाराचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.
टीप : काजू-पिस्ता रोल चार दिवस चांगला टिकतो. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.