बुंदी – पापडाची भाजी (Bundi Papad Bhaji)

बुंदी – पापडाची भाजी (Bundi Papad Bhaji)

बुंदी – पापडाची भाजी

साहित्य: 1 कप खारी बुंदी, 4 पापड (तुकडे करून), 1 चिरलेला टोमॅटो, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून राई व 1 कप पाणी.

कृती: तेल गरम करून त्यात राईची फोडणी द्या. टोमॅटो व काश्मिरी लाल मिरची पूड टाकून 3-4 मिनिटे शिजवा. 1 कप पाणी टाका. एक उकळी येऊ द्या. सगळे साहित्य घालून थोडा वेळ शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.