बुंदीचे लाडू (Bundi Laddu)

बुंदीचे लाडू (Bundi Laddu)

बुंदीचे लाडू

साहित्य : 1 वाटी बेसन, पाव वाटी बदाम-पिस्ता काप, पाव वाटी मनुका, 2 वाट्या साखर, पाव चमचा केशर, स्वादानुसार वेलची पूड, तळण्यासाठी तेल.

कृती :
बेसनामध्ये एक चिमूट मीठ घालून मिश्रण पातळसर भिजवा. बुंदी झार्‍याच्या साहाय्याने थेट तेलात बुंदी पाडून, तळून घ्या. साखरेचा दोन तारी पाक तयार करा. त्यात केशराच्या काड्या एकजीव करा. नंतर त्यामध्ये बुंदी घालून 2 मिनिटं ठेवा. पाकातून बुंदी काढून त्यामध्ये सुकामेवा आणि वेलची पावडर घालून गरम असतानाच लाडू वळून घ्या.

टीप

* बुंदी घालते वेळी साखरेचा पाक गरमच असावा.
* मोतीचूर बुंदीचा झारा बाजारात विकत मिळतो.
* बुंदी गाळते वेळी कढईच्या बाजूने एक उभा पाट लावा.