पावाची खीर (Bread Kheer)

पावाची खीर (Bread Kheer)

पावाची खीर

साहित्य : 1 वाटी पावाचा चुरा, 2 चमचे तूप, 1 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर, स्वादानुसार वेलची व जायफळ पूड, थोडी चारोळी.

कृती :
दूध थोडं आटवून घ्या. थोड्या तुपात पावाचा चुरा भाजून घ्या आणि आटवलेल्या दुधात घाला. त्यानंतर वेलची-जायफळ पूड आणि चारोळी भाजून त्यात घाला. थंड झाल्यावर खाण्यास घ्या.

टीप :
पावाचे स्लाइसेस उन्हामध्ये कडकडीत वाळवून त्याचा चुरा करा.