भेंडी मसाला (Bhendi Masala)

भेंडी मसाला (Bhendi Masala)

भेंडी मसाला

साहित्य : पाव किलो भेंडी, अर्धा वाटी तीळ, अर्धा वाटी बेसन, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग,
1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आमचूर पूड, 1 टीस्पून ओवा, अर्धा वाटी तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : भेंडी धुऊन कोरडी करून घ्या. नंतर उभी चिरून घ्या. एका पॅनमध्ये तेल आणि भेंडीव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घालून एकत्र भाजून घ्या. मसाला खमंग भाजला की, आचेवरून उतरवा आणि भेंड्यांच्या कापांना चोळून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून, त्यात मसाला लावलेली भेंडी घाला आणि कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्या. गरमागरम भेंडी मसाला पराठ्यासोबत सर्व्ह करा.