बेसनाचे मोदक (Besan Modak)

बेसनाचे मोदक (Besan Modak)

साहित्य : 1 कप बेसन, पाऊण कप दळलेली साखर, अर्धा कप तूप, अर्धा टीस्पून वेलची पूड, 2 टेबलस्पून काजूची जाडसर पूड.
कृती : जाड बुडाच्या भांड्यामध्ये बेसन एक मिनिट परतवा. नंतर त्यात तूप घालून मिश्रण सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतवा. साधारण 8-9 मिनिटात मिश्रण सोनेरी रंगाचं होईल. नंतर त्यात दळलेली साखर, वेलची पूड आणि काजूची पूड घालून एकजीव मिश्रण तयार करा. मिश्रण कोरडं वाटत असल्यास, त्यात 2-3 चमचे तूप एकत्र करता येईल. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून, त्याचे लहान गोळे तयार करा आणि ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यामध्ये दाबून भरा आणि मोदक तयार करा.