मेथीचा झुणका (Besan Methi)

मेथीचा झुणका (Besan Methi)

मेथीचा झुणकासाहित्य :
2 कप स्वच्छ करून बारीक चिरलेली मेथीची पानं, पाव कप बारीक बारीक चिरलेले कांदे, पाऊण कप बेसन, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून मोहरी, 3 लसणाच्या पाकळ्या किसलेल्या, अर्धा इंच आलं किसलेलं, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून धणे पूड, पाव टीस्पून गरम मसाला पूड, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : मंद आचेवर बेसन कोरडेच भाजून घ्या. बेसन सतत परतत राहा. बेसन व्यवस्थित भाजलं की, बाजूला काढून ठेवा. एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, त्यात हिंग घाला. नंतर आलं, लसूण आणि कांदा घाला. मंद आचेवर कांदा पारदर्शक होईपर्यंत परतवा. नंतर त्यात धणे पूड, हळद, लाल मिरची पूड आणि गरम मसाला घालून परतवा. मिश्रण तेल सोडू लागलं की, त्यात मेथीची पानं घालून चांगलं एकजीव करा. आता झाकण लावून शिजत ठेवा. नंतर मंद आचेवर मिश्रण सतत ढवळत राहून त्यात भाजलेलं बेसन मिसळा. स्वादानुसार मीठ मिसळा. गरज भासल्यास थोडं पाणी घाला. मात्र झुणका कोरडाच असला पाहिजे. आता आचेवरून उतरवून गरमागरम झुणका, भाकरीसोबत सर्व्ह करा.