केळ्याच्या मुठिया (Banana Muthia)

केळ्याच्या मुठिया (Banana Muthia)

केळ्याच्या मुठियासाहित्य :
3-4 उकडलेली कच्ची केळी, 1 टेबलस्पून किसलेलं आलं, 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरं, 2 टेबलस्पून राजगिर्‍याचं पीठ, स्वादानुसार सैंधव, अर्धा टीस्पून साखर, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, हिरवी चटणी.

कृती : केळी किसून घ्या. त्यात आलं, हिरवी मिरची, जिरं, साखर, मीठ आणि कोथिंबीर घालून एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणाच्या मुठिया तयार करून घ्या. त्या राजगिर्‍याच्या पिठामध्ये घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम केळ्याच्या मुठिया हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.