केळी मावा बर्फी (Banana Mawa Burfi)

केळी मावा बर्फी (Banana Mawa Burfi)

केळी मावा बर्फी

साहित्य : 3 केळ्यांचा कुस्करलेला गर, 1 कप मावा, अर्धा कप पिठीसाखर, 2 टेबलस्पून खोवलेला नारळ, 1 टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून खसखस, 1 टेबलस्पून साजूक तूप.

कृती : एका कढईत मंद आचेवर मावा 10 ते 12 मिनिटं परतवून घ्या. मावा भाजून गुलाबी रंगाचा व्हायला हवा. नंतर त्यात केळ्याचा गर मिसळून पाच मिनिटं परतवा. आता त्यात पिठीसाखर, खोबरं, वेलची पूड, खसखस आणि अर्धा टेबलस्पून तूप घाला. मिश्रण दोन-तीन मिनिटं चांगलं परतवा. आता ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात लावून, त्यात हे मिश्रण पसरवा. मिश्रण सारखं करून आवडीप्रमाणे आकाराच्या वड्या पाडा. ताट अर्धा तास तसंच ठेवून, नंतर बर्फी वेगळा ताटात काढून घ्या.

टीप :
* मावा आधीच जास्त भाजला, तर नंतर केळीसोबतही पुन्हा भाजला जाऊन लाल होईल. तेव्हा हा मुद्दा लक्षात ठेवून मावा भाजा.
* बर्फीत आधी अर्धा टेबलस्पूनच तूप घाला. नंतर आवश्यकता भासल्यास अजून तूप मिसळा.