बाजरीची खिचडी (Bajra Khichadi)

बाजरीची खिचडी (Bajra Khichadi)

बाजरीची खिचडी

साहित्य : अर्धा वाटी बाजरी, अर्धा वाटी पिवळी मूग डाळ, स्वादानुसार मीठ, 1 टेबलस्पून तूप, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद.
कृती : बाजरी आठ तास भिजत घाला. नंतर धुऊन, निथळून घ्या. मूग डाळ धुऊन निथळून घ्या. बाजरी आणि मूग डाळ एकत्र करून त्यात मीठ आणि 2 वाटी पाणी घालून व्यवस्थित एकत्र करा. हे मिश्रण कुकरमध्ये 4 शिट्या काढून शिजवा. नंतर कुकर थंड होऊ द्या.
एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये तूप गरम करा आणि त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं की, त्यात हिंग आणि हळद घालून मध्यम आचेवर काही सेकंद परतवा. नंतर त्यात बाजरी आणि मूग डाळीचं शिजवलेलं मिश्रण घालून व्यवस्थित एकत्र करा आणि मध्यम आचेवर 2-3 मिनिटं शिजवा. गरमागरम बाजरीची खिचडी साजूक तूप घालून सर्व्ह करा.