वांग्याचं भरीत (Baingan Bharta)

वांग्याचं भरीत (Baingan Bharta)

वांग्याचं भरीत

साहित्य : 2 मोठी पांढरी भरताची वांगी, 1 वाटी बारीक चिरलेला पांढरा कांदा, अर्धा वाटी घट्ट दही, अर्धा वाटी खारे शेंगदाणे, अर्धा वाटी तीळ, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून मोहरी, स्वादानुसार मीठ.
कृती : वांगी स्वच्छ धुऊन घ्या. नंतर टूथपिकच्या साहाय्याने त्यावर थोडे टोचे मारा. वांग्यांवर थोडं तेल चोळून, थेट आचेवर भाजून घ्या. आच मंद ठेवा. वांगी व्यवस्थित भाजली की, थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावर सोलून बारीक चिरा. एका मोठ्या वाडग्यामध्ये वांग्याचा गर, दही, कांदा आणि कोथिंबीर एकजीव करून घ्या.
आता फोडणीच्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, लाल मिरची पूड यांची फोडणी करा. त्यात तीळ आणि शेंगदाणे घालून आच बंद करा. नंतर मीठ घालून फोडणी एकजीव करा आणि वांग्याच्या मिश्रणात घालून एकजीव करा. गरमागरम वांग्याचं भरीत भाकरीसोबत सर्व्ह करा.