वांग्याचं भरीत (Baingan Bharatha)

वांग्याचं भरीत (Baingan Bharatha)

वांग्याचं भरीतसाहित्य :
1 मोठं काळं वांगं, अर्धा टीस्पून तेल, 1 टेबलस्पून तूप, 1 टीस्पून जिरं, अर्धा वाटी उभा चिरलेला कांदा, दीड टीस्पून किसलेलं आलं, 1 टीस्पून किसलेला लसूण, 1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धणे-जिरे पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती :
वांग्याला अर्धा टीस्पून तेल चोळून थेट आचेवर भाजा. वांगं व्यवस्थित शिजलं पाहिजे. नंतर थंड करून त्याचं साल काढून टाका आणि वांग्याचा गर व्यवस्थित स्मॅश करून
बाजूला ठेवून द्या.
आता एका कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं की, त्यात कांदा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परतवा. नंतर त्यात टोमॅटो, हळद आणि धणे-जिरे पूड घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतवा. आता त्यात स्मॅश केलेलं वांगं, गरम मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून तीन-चार मिनिटं परतवा. गरमागरम बैंगन का भरता, अर्थात वांग्याचं भरीत कोथिंबीर घालून सजवा आणि सर्व्ह करा.