बेबीकॉर्न पनीर मसाला (Baby Corn Paneer Masala)

बेबीकॉर्न पनीर मसाला (Baby Corn Paneer Masala)

साहित्य : 10-12 बेबीकॉर्न पातळ स्लाइस केलेले,  2 टेबलस्पून तेल, 50 ग्रॅम चौकोनी तुकडे केलेले पनीर, 2 कप टोमॅटो प्युरी, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून कसुरी मेथी, पाव टीस्पून जिरे पूड, पाव टीस्पून गरम मसाला पूड.
वाटण करण्यासाठी : 10-12 काजू, पाव कप गरम पाण्यात भिजवलेल्या 2 अख्ख्या लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 चिरलेले कांदे, अर्धा कप पाणी. हे सर्व साहित्य एकत्र बारीक वाटून घ्या.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात काजू आणि कांद्याची पेस्ट परतवा. मिश्रणाला तेल सुटू लागलं की, त्यात मीठ, सर्व सुक्या मसाल्यांची पूड, टोमॅटो प्युरी, पनीरचे तुकडे आणि बेबीकॉर्न घालून मंद आचेवर 5 मिनिटं शिजवा. शेवटी कसुरी मेथी घालून सजवा आणि गरमागरम चपातीसोबत सर्व्ह करा.
टीप : टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी लालबुंद टोमॅटो थोड्या पाण्यात उकडून घ्या. टोमॅटो थंड झाले की, बारीक वाटून घ्या.