बेबीकॉर्न मंच्युरियन (Baby Corn Manchurian)

बेबीकॉर्न मंच्युरियन (Baby Corn Manchurian)

बेबीकॉर्न मंच्युरियन

साहित्य : 200 ग्रॅम बेबीकॉर्न (लांबट चिरून मीठ घातलेल्या पाण्यात उकडलेले), अर्धा कप कॉर्नफ्लोअर, पाव कप तांदळाचं पीठ, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून आलं-लसणाची पेस्ट, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून रेड चिली सॉस, 1 टीस्पून ऑरिगॅनो, 1 टीस्पून व्हिनेगर, तळण्यासाठी तेल, 1 जुडी पातीचा कांदा बारीक चिरलेला, 1 उभा पातळ चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, 2 टीस्पून ऑलिव्ह ऑईल, स्वादानुसार मीठ.

कृती : तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर, लाल मिरची पूड, आलं-लसूण पेस्ट आणि थोडं मीठ घालून भज्याप्रमाणे मिश्रण तयार करा. या मिश्रणात बेबीकॉर्नचे तुकडे घोळवून, गरम तेलात तळून घ्या. दुसर्‍या पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करून त्यात कांदा, लसूण आणि पातीचा कांदा परतवून घ्या. नंतर त्या तळलेले बेबीकॉर्न, सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, थोडं मीठ, टोमॅटो केचप आणि ऑरिगॅनो एकत्र करून थोडं परतवा आणि गरमागरम सर्व्ह करा.