उसाच्या रसातले लाडू आणि बुंदीचे लाडू (Awesome L...

उसाच्या रसातले लाडू आणि बुंदीचे लाडू (Awesome Laddu Recipes)

उसाच्या रसातले लाडू


साहित्य : 1 ग्लास उसाचा रस, 1 वाटी तांदळाचा रवा, 1 वाटी नारळाचं घट्ट दूध, 1 चमचा वेलची पूड.
कृती : तांदूळ तीन-चार तास भिजत ठेवा. नंतर निथळून तासभर तसेच ठेवा. आता या तांदळाचा जाडसर रवा वाटून घ्या. हा रवा तांबूस रंगावर भाजून घ्या.
थंड झाल्यावर त्यात नारळाचं दूध घालून मिश्रण तयार करा. उसाचा रस उकळून थोडा दाटसर करून घ्या. त्यात तांदळाच्या रव्याचं मिश्रण घालून सतत ढवळत राहा. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्या. लाडू वळण्याइतपत मिश्रण दाट झालं की, त्याचे लाडू वळून घ्या.

बुंदीचे लाडू


साहित्य : 1 वाटी बेसन, पाव वाटी बदाम-पिस्ता काप, पाव वाटी मनुका, 2 वाट्या साखर, पाव चमचा केशर, स्वादानुसार वेलची पूड, तळण्यासाठी तेल.
कृती : बेसनामध्ये एक चिमूट मीठ घालून मिश्रण पातळसर भिजवा. बुंदी झार्‍याच्या साहाय्याने थेट तेलात बुंदी पाडून, तळून घ्या. साखरेचा दोन तारी पाक तयार करा. त्यात केशराच्या काड्या एकजीव करा. नंतर त्यामध्ये बुंदी घालून 2 मिनिटं ठेवा. पाकातून बुंदी काढून त्यामध्ये सुकामेवा आणि वेलची पावडर घालून गरम असतानाच लाडू वळून घ्या.
– विष्णू मनोहर