पनीर जिलेबी गुळाची जिलेबी (Awesome Jalebi Recipes)

पनीर जिलेबी गुळाची जिलेबी (Awesome Jalebi Recipes)

पनीर जिलेबी

साहित्य : 2 वाटी पनीरची पेस्ट, 2 वाटी साखरेचा पाक, अर्धा वाटी आरारूट, काही केशराच्या काड्या, थोडे बदाम-पिस्त्याचे काप, तळण्यासाठी तूप.
कृती : पनीरमध्ये आरारूट मिसळून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण जिलेबीच्या मिश्रणाप्रमाणे पातळ व्हायला हवं. आता तूप गरम करत ठेवा. ते गरम झालं की, आच मंद करून, गरम तुपात छिद्र असलेल्या कापडातून अलगद जिलेबी सोडा. जिलेबी तळल्यावर तुपातून काढून थेट साखरेच्या पाकात घाला आणि पाकातूनही लगेच काढून, त्यावर बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवा. पनीर जिलेबी गरमागरम किंवा थंड करून सर्व्ह करा.
टीप : पनीर जिलेबी साखरेच्या पाकात अधिक वेळ ठेवल्यास साखरेत पनीर विरघळण्याची शक्यता असते.

गुळाची जिलेबी

साहित्य : 1 वाटी मैदा, 2 चमचे आरारूट, 2 चमचे बेसन, 2 चमचे दही, 1 वाटी एकतारी गुळाचा पाक, तळण्यासाठी तूप.
कृती : जिलेबी करायच्या आदल्या दिवशी मैदा आणि बेसनात आरारूट व दही घालून कोमट पाण्यात घट्टसर भिजवून ठेवा. जिलेबी करण्यापूर्वी गुळाचा पाक तयार करून घ्या. आचेवर तूप गरम करत ठेवा. जिलेबीचं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या. हे पीठ एका छिद्र असलेल्या कापडात घालून, थेट गरम तुपात हळुवार एक-एक जिलेबी सोडा. जिलेबी तळल्यानंतर तुपातून काढून थेट गुळाच्या गरम पाकात बुडवा आणि नंतर सर्व्ह करा.
– विष्णू मनोहर