आंबा डाळ (Amba Daal)

आंबा डाळ (Amba Daal)

आंबा डाळ

साहित्य : 2 वाटी चणा डाळ (4-5 तास भिजवलेली), 2 कैर्‍या (किसलेल्या), 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून साखर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, थोडं खोवलेलं ओलं खोबरं.
फोडणीसाठी : 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, 7-8 सुक्या लाल मिरच्या (बारीक चिरलेल्या).
कृती : चणा डाळ चाळणीतून निथळून घ्या. चणा डाळ आणि हिरवी मिरची मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. आवश्यकता भासल्यास त्यात थोडं पाणी मिसळून वाटा. हे मिश्रण एका वाडग्यात काढून त्यात कैरीचा कीस, साखर, मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित एकत्र करा. आता फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, मिरच्या, हिंग आणि हळद घाला. ही खमंग फोडणी आंबा डाळीवर घालून मिसळा. त्यावर ओलं खोबरं भुरभुरा आणि सर्व्ह करा.

टीप : खरं तर आंबा डाळ तयार करण्यासाठी कच्ची चण्याची डाळ वापरली जाते. मात्र कच्ची नको असल्यास, कढईत फोडणी करून त्यात जाडसर वाटलेलं चणा डाळ-मिरचीचं वाटण घालून एक वाफ काढा आणि त्यानंतर त्यात कैरीचा कीस, साखर, मीठ आणि कोथिंबीर मिसळा.